चिमूर :- महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर हजारो भाविकांनी जाभुळघात वरून जवळ असलेल्या आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या निसर्गाच्या कुशीत जंगलांनी वेढलेल्या पेरजागड(सात बहिणीचे डोंगर) तसेच जंगल टेकड्यानी वेढलेल्या लावारी गावातील गोसाईदेव येथील महादेव व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमील महादेवाचे दर्शन हजारो भक्त भाविकांनी घेतले या तिन्ही ठिकाणी महाशिवरात्री निमित्य दर्शनासाठी भक्त भाविकांची एकच गर्दी उसळली होती.
कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये यासाठी महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या यात्रा व जत्रावर शासनाने बंदी घातली असली तरी मंदिरे सुरू असल्यामुळे भक्त भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी कालपासून गर्दी केली होती कारण मागील दोन वर्षापूर्वी मंदिरे बंद होती त्यामुळे भक्त भाविकांच्या उत्साह वर विरजण पडले होते परंतु यावर्षी या परिसरातील पेरजागड व लावारी येथील गोसाईदेव भजन कीर्तन आणि अनेक विविध कार्यक्रम आयोजित करून व कोरोनाचे नियमाचे पालन करून साजरे केले अनेक भक्त भाविकांनी यात भाग घेऊन महादेवाचे दर्शन घेतले यात हर हर महादेव भजन मंडळ तळोधी , श्रीराम भजन मंडळ सिरपूर, बेलदेव भजन मंडळ नवतला, मंजुळा माता भजन मंडळ बोथली यांनी जागृती भजनात भाग घेतला होता. तसेच या भजन मंडळांनी वारी काढून पेरजागड गोसाईदेव लावारी व गोंदेडा येथील महादेवाचे दर्शन घेतले यावेळी या मंडळात प्रमुख म्हणून एकनाथ बोरकर सिरपूर,शंकर रामटेके कोटगाव, दामोदर बोरकर पिपर्दा, रत्नमाला सोनुने गोंडेदा ,गुलाब बोरकर शेंडेगाव ,दशरथ सारये , सुरेश नेवारे कुंडली श्रीरामे ,प्रवीण जाभुले ,नानाजी सोनवाने ,महादेव श्रीरामे ,मारुती सहारे ,पुस्पा सहारे ,सुरेखा सोनवणे ,राजू सोहरे, मधुकर कावळे, पूर्वी सोयरे आदी उपस्थित होते
या तिन्ही ठिकाणी महाशिवरात्री ची यात्रा भरते परंतु कोविड मुळे सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या परंतु भक्त भाविकांना दर्शनासाठी मंदिरे उघडण्यात आले होते. यावेळी दर्शनाला येणाऱ्या भक्त भाविकांना उपासाचे फराळाचे वाटप करण्यात आले तर २ मार्च रोज बुधवारला महाप्रसाद व मसाले भाताचे वितरण करण्यात आले होते. भक्त भाविकांचा महासागर या ठिकाणी भरला होता भाविक पूजा अर्चा करून दर्शन घेऊन जात होते. खूप दूर पासून भाविक येत होते आणि यामुळे गर्दी उसळली होती