गोंडपिपरी – सूरज माडूरवार
गोंडपिपरी शहरात दि.(६) शुक्रवारी काही अज्ञात इसमांकडून इलेक्ट्रिक पोलवर अनधिकृतपणे लोखंडी आकडा टाकून वीजचोरी करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपक वांढरे यांनी महावितरण विभागाला दिली. महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी व कारवाईचे आदेश लाईंनमेन हिराजी ठेंगणे, रवींद्र जांभुळकर,trandnyप्रेमानंद गौरकार यांना फोन करून सांगितले.या तिन्ही महावितरण कर्मचाऱ्यांनी सहकारी मित्र किशोर बोरकुटे याला सोबत घटनास्थळी धाड टाकली.
शहरात चिंतामणी कॉलेजच्या बाजूला राजस्थान,मध्यप्रदेश येथून आलेल्या खुर्च्या,टेबल विक्रेत्यांकडून अनाधिकृतपणे विज चोरी करत असल्याचे आढळून आले .यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्या राजस्थान, मध्यप्रदेशच्या खुर्च्या विक्रेत्यांना सांगितले की हे अनाधिकृतपणे आहे त्यामुळे याच्यामुळे एखादी घटना घडू शकते तुमच्यावर कारवाई होणारं असे सांगतात तुम्ही कोण आम्हाला सांगणारे म्हणून त्या खुर्च्या विक्रेत्यांच्या जमावाने या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना व सोबत आलेल्या सहकाऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर अशी दुखापत अधिकाऱ्यांना झाली त्यांच्यावरती गोडपिंपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून स्थानिक नागरिकांकडून त्या खुर्च्या टेबल परप्रांतीय विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केल्या जात आहे . लाईनमेन ठेंगणे महावितरण तर्फे पोलिसात तक्रार दाखल केली असून १७ आरोपींना रात्रीच शोध मोहीम राबवून ताब्यात घेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहे .पुढील तपास पीएसआय मंगेश कराडे,प्रशांत नैताम करीत आहे.
परप्रांतीय नागरिकांकडून गोंडपिपरीतील वीज वितरण कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण ही निंदनीय आहे पोलिसांनी कठोर कारवाई करावी.शहरात वास्तव्यास असणाऱ्या बाहेरील अनोळखी व्यक्तींचे आधार कार्ड व संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनमध्ये जमा करूनच त्यांना राहण्याची परवानगी द्यावी.
– सचिन चिंतावार नगरसेवक गोंडपिपरी












