• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home अमरावती

जनतेच्या सेवेसाठीच ‘कर्तव्य यात्रा’- पालकमंत्री बच्चू कडू

पालकमंत्र्यांच्या ‘कर्तव्य यात्रे’चा जांभा बु. येथून प्रारंभ

Ashish Ghume by Ashish Ghume
February 25, 2022
in अमरावती
Reading Time: 1 min read
A A
0
जनतेच्या सेवेसाठीच ‘कर्तव्य यात्रा’- पालकमंत्री बच्चू कडू
Spread the Information

अकोला– आपला देश प्रजासत्ताक आहे.याचाच अर्थ इथं प्रजा सत्ताधारी आहे, आणि लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत. नागरिकांची सरकार दप्तरी प्रलंबित असणारी कामे, एकाच जागी व्हावी, त्यांना हेलपाटे करावे लागू नये, हा ‘कर्तव्य यात्रे’चा उद्देश असून ही यात्रा केवळ जनतेच्या सेवेसाठी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जांभा बु. ता.मूर्तिजापूर येथे केले.

RelatedPosts

जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही.

पुलगाव येथे खवल्या मांजराची विक्री करताना ६ आरोपींना रंगेहाथ पकडले

नितेश मेश्राम मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करणार

जांभा बु. येथे आज पालकमंत्री कडू यांच्या संकल्पनेतून ‘कर्तव्य यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी पंचायत समिती सभापती उर्मिला डाबेराव, सरपंच जांभा बु.  अरुणा इंगळे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधीक्षक अभियंता जलसंपदा सुनील राठी, कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे, सहा. कामगार आयुक्त राजू गुल्हाने, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, तहसीलदार प्रदीप पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस.काळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तेरानिया तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

कर्तव्य यात्रेचा शुभारंभ जांभा बु. या पुनर्वसित गावठाणात करण्यात आला. प्रारंभी संत गाडगेबाबा यांचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्री कडू म्हणाले की, लोकांना सरकार दप्तरी असलेले एक काम करण्यासाठी तालुक्याच्या गावी जावे लागते. त्यांना खर्च तर होतोच शिवाय कामासाठी अनेक ठिकाणी जावे लागते, यामुळे अनेकदा मनस्ताप ही होतो. अशावेळी ह्या सर्व यंत्रणांना एकाच छताखाली आणून लोकांचा हा त्रास वाचविण्याचा व त्यांना पारदर्शक सेवा त्यांच्या गावात जाऊन देण्याचा हा प्रयत्न आहे. यामागे केवळ सेवाभाव हाच उद्देश आहे. याठिकाणी विविध सेवांचे स्टॉल लावण्यात आले आहे. एकाच ठिकाणी ह्या सर्व सुविधा आणल्या आहेत, असेही पालकमंत्र्यानी यावेळी स्पष्ट केले. पुनर्वसित गावातील लोकांना द्यावयाच्या सर्व सुविधा देण्यात येतील. याठिकाणी न्याय प्रविष्ठ बाबी वगळता सर्व सेवा सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे,असेही पालकमंत्र्यानी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी लोकांना देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली. सूत्रसंचालन आकांक्षा गोमासे यांनी केले.

या उपक्रमात विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. त्याद्वारे नागरिकांना त्या त्या विभागांच्या योजनांची माहितीही देण्यात आली तसेच त्या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक प्रक्रियाही राबविण्यात आली. या शिवाय महिलांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली होती. त्याचाही महिलांनी लाभ घेऊन आरोग्य तपासणी करुन घेतली.

Tags: Bachchubhau kadu
Previous Post

सगळ्यांना सोबतीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले -बाबासाहेब जाधव

Next Post

डी.बी.टी व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ द्या

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
डी.बी.टी व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ द्या

डी.बी.टी व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1