सातारा :- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी बेमुदत संप पुकारला होता ,त्यामुळे अनेक कॉलेज विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहेत.
त्याचबरोबर अनेक विद्यार्थी चालू वर्षात शैक्षणिक प्रवेश सुद्धा करत आहेत.सामाजिक न्याय विभागातर्फे डी.बी.टी व स्वाधार स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास मुदत येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत आहे. त्यामूळे अनेक प्रामाणिक अभ्यासू विद्यार्थी या यांसारख्या योजनेपासून , स्कॉलरशिपपासून वंचित राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाला आणि सामाजिक न्याय विभाग मंत्री यांना विनंती आहे की डी.बी.टी व स्वाधार स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास मुदत वाढवून देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी सोशल मिडियाद्वारे जोर धरू लागली आहे .तसेच भारतीय विद्यार्थी मोर्चा तर्फे ही मागणी होत आहे.
विद्यार्थी जर योजनेपासून वंचित रहात असतील तर ती योजना काय कामाची . आधीच कोरोनामुळे हतबल झालेला विद्यार्थी या शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये अन्यथा भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने आंदोलन उभारू ..
किरण रमेश कांबळे
महाराष्ट्र राज्य महासचिव
काॅलेज एवमं विश्वविद्यालय