मोहोळ(सोलापूर) : तालुक्यातील कुरुल येथे 19 फेब्रुवारी चे 23 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.
समारोप निमित्त भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव व रमेश आप्पा जाधव पैलवान व छावा संघटना जिल्हा उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली.
अठरापगड जाती व बारा बलुतेदार यांना सोबतीला घेऊन सगळ्या मावळ्यांच्या सहकाऱ्यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही धर्माविरोधात नव्हते तर मुगला कडून होणारा जनतेवर अन्याय अत्याचार स्त्रियांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी व होणारी देव देवतांची विटंबना थांबवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलाई विरोधात लढा दिला व रयतेचे राज्य निर्माण केले व राजे शहाजी राजे व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्वप्नातले रयतेचे राज्य मावळ्यांना सोबतीला घेऊन निर्माण केले व प्रत्येकाच्या मनामध्ये स्वराज्य हे आपल आहे. अशा प्रकारची भावना निर्माण केली.रयत राजांचा जयजयकार करू लागली राजांकडे सर्वांसाठी न्याय सारखाच होता. म्हणूनच साडे तीनशे वर्षांपासून छत्रपती शिवाजी राजांची जयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात मध्ये देशातच काय पण देशाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येते. महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक घराघरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते महाराजांचा विचार आणि आचार जगामध्ये आज पण घेतला जातो.
छत्रपती शिवाजी राजांची जयंती 19 फेब्रुवारी ते 23फेब्रुवारी पर्यंत छत्रपती शिवाजी चौकामध्ये मोठ्या उत्साहाने सगळ्या जाती धर्मांचे लोक एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. प्रतिमेचे पूजन बाबासाहेब जाधव व रमेश जाधव पैलवान यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले .
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष छत्रगुन तात्या जाधव,लिंगेश्वर निकम, माऊली जाधव सर, प्रमोद जाधव ,प्रमोद लांडे ,पांडू पाटील, भारत जाधव, दर्लिंग जाधव ,सचिन जाधव ,औदुंबर जाधव व छत्रपती उत्सव समिती व छत्रपती युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने साजरी करण्यात आली. अध्यक्ष सुरज जाधव उपाध्यक्ष सोनू जाधव,प्रतिक निकम, प्रदीप जाधव, पुरुषोत्तम जाधव, रत्नदीप कोरे ,लिंगेश्वर बाबर ,विजय निकम, विजय जाधव ,प्रतिक जाधव, ओंकार काटकर,गणेश कुंभार ,वैभव भोसले ,प्रथमेश जाधव, कुरुल ग्रामस्थ उपस्थित होते.