मूल प्रतिनिधी (रोहित कामडे)
मूल शहरातील गुजरी चौकात शतकानुशतके चालत आलेली बैल पोळा परंपरा यावर्षी भव्य उत्सवाच्या रूपात साजरी करण्यात आली. बाजार चौक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मागील वर्षीपासून या उत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे, आणि यंदा शेकडो जोड्यांनी स्पर्धेत भाग घेतला.
स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी अत्यंत चुरस दिसून आली, ज्यामुळे दोन स्पर्धकांना समान गुण मिळाल्याने ईश्वर चिठी टाकून निर्णय घेण्यात आला. त्यात प्रथम क्रमांक मनोज बोर्डावार यांना मिळाला, ज्यांना स्व. भावनाताई टहलियानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या नातवंडांकडून रु. 5001 रोख व शिल्ड देण्यात आली. द्वितीय क्रमांक मयूर कावळे यांना मिळाला, ज्यांना माजी नगरपरिषद सभापती प्रशांत समर्थ यांच्या सौजन्याने रु. 3001 रोख व शिल्ड प्रदान करण्यात आली. तृतीय क्रमांक अनिल संतोषवार यांच्या सौजन्याने रु. 2001 रोख व शिल्ड देण्यात आला.
या स्पर्धेत चौथा क्रमांक मारोती कावळे यांना मिळाला, त्यांना रवींद्र बोकारे यांच्या सौजन्याने रु. 1001 रोख व शिल्ड देण्यात आली. तसेच, पाचव्या ते आठव्या क्रमांकापर्यंत अनुक्रमे गणेश बुटले, मनोज कावळे, गणेश शेरकी, व मधुकर गुरनुले यांना चामडी बॅग व शिल्ड देण्यात आल्या. या सर्व बक्षिसांचे आयोजन नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराच्या सौजन्याने करण्यात आले होते.
स्पर्धेचे परीक्षक प्राचार्य शशिकांत धर्माधिकारी आणि प्रा. सुधीर नागोसे यांनी आपले काम कौशल्याने पार पाडले. या कार्यक्रमाला नगर भाजप अध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी नप उपाध्यक्ष मोतीलाल टहलियानी, प्रवीण मोहूरले, माजी नप बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, नगर महामंत्री चंद्रकांत आष्टनकर, किशोर कापगते, रिंकू मांदाडे, संजय मारकवार, ऍड. बल्लू नागोसे, प्रमोद कोकूलवार, आणि प्रवीण मोहूरले यांची विशेष उपस्थिती होती.
मंडळाचे सदस्य प्रेषित निकोडे, यश बोकारे, तन्मय संतोषवार, वैभव निकुरे, विक्की रामटेके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.