गोंडपिपरी – (सूरज माडूरवार)
राज्य शासनाने कार्यरत नगराध्यक्षांना मुदतवाढ दिली त्यामुळे खुर्चीची आस बाळगलेल्या अनेकांचा भ्रमनिराश झाला तर दि.(२६) सोमवारी गोंडपिपरी नगराध्यक्षा सविता कुळमेथे यांनी पदभार स्वीकारत नवी इनिंग सुरू केली.
नगराध्यक्षांच्या गैरवर्तनुकीची चौकशी व हेरींग उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुरू असताना
दुसरीकडे आज दि.(२७) मंगळवारी शहरातीलच कंत्राटदाराने नगराध्यक्ष बिलावर स्वाक्षरी मारण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याची तक्रार दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सध्या तरी गोंडपिपरी नगरपंचायत या ना त्या कारणावरून बरीच चर्चेत आहे. नगराध्यक्ष सविता कुळमेथे यांच्या कारभाराला कंटाळून १४ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला तर आपल्या कारकिर्दीत नगराध्यक्ष यांनी भ्रष्टाचार केल्याची तक्रारही नगरसेवकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली ही घटना ताजी असतानाच नगरपंचायत अंतर्गत केलेल्या कामाचे बिल काढण्याकरिता नगराध्यक्ष सविता कुळमेथे यांनी पैशाची मागणी केल्याचं खळबळजनक आरोप पायल कन्स्ट्रक्शनचे वनिता निलेश संगमवार यांनी केला याबाबत यांनी उपविभागीय अधिकारी तसेच मुख्याधिकारी नगरपंचायत गोंडपिपरी यांना लेखी तक्रार देखील केली आहे.त्यामुळे गोंडपिपरी न. प.मध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न पडत आहे. नगर पंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ व १० मधील जिल्हा परिषद कन्या शाळा ते मासूम धनवंती दर्गा पर्यतच्या सिमेंट काँक्रेट मार्गाचे काम जानेवारी महिन्यात पायल कन्स्ट्रक्शन यांना मिळाले. बांधकाम देखील पूर्ण झाले.कामाचा दर्जा उत्कृष्ट असल्याचा शेरा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मारला.सर्व प्रक्रिया पार पडल्यावर कामाचे देयक साठी नगरपंचायत गोंडपिपरी येथे सादर करण्यात आले.मात्र नगराध्यक्ष यांनी देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी पैशाची मागणी केली.असा गंभीर आरोप पायल कन्स्ट्रक्शनचे वनिता संगमवार यांनी केला तक्रारीतून करत कारवाईची मागणी केली आहे.अडिज वर्षांपूर्वी नगर पंचायत अंतर्गत पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेत काँग्रेसच्या सविता कुळमेथे ह्या नगराध्यक्ष झाल्या त्यांचा अडीज वर्ष कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आरक्षण बदलाची वाट पाहणाऱ्या नगरसेवकांची निराशा झाली.राज्य सरकारने ५ वर्ष आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतआहे. त्यामुळे भाजप,राष्ट्रवादी सहित सत्तेत असलेल्या कांग्रेस व शिवसेना(उबाठा)नगर सेवकांनी नगराध्यक्ष विरुद्ध बंड फुकारले.काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपशी हातमिळवणी करीत भ्रमंती दौरा केला. नगराध्यक्ष यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत तक्रार दाखल केली. यातच पुन्हा एकदा बिल काढण्यासाठी नगराध्यक्ष यांनी थेट पैसे मागण्याचा आरोप होत असून एकंदरीत सविता कडून येथे यांची दोन्ही बाजूने चांगली पंचायत होत आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तीन ते चार महिन्यांपासून सदर कामासाठी निधी उपलब्ध नव्हती.त्यामुळे बिलासाठी उशीर झाला.मला नगर अध्यक्ष पदाची मुदतवाढ मिळाली त्यानंतर मी न्यायालयीन प्रक्रियेत व्यस्त होती.दरम्यान सिओंची बदली झाली.मी दि (२६) सोमवारी पदभार हाती घेतला.आज कार्यालयात बसून सदर कामाची फाईल तपासणार आहे.कायदेशीर सल्लागार आणि प्रशासकीय प्रमुख म्हणून यापूर्वी सीओ यांची बिलावर स्वाक्षरी झाली असल्यास नियम तपासून त्यावर मी स्वाक्षरी करणार आहे.विकास कामाला गती मिळावी,त्याचबरोबर प्रशासकिय कारभार पारदर्शक पद्धतीने चालवा हा आपला उद्देश आहे. कंत्राटदाराने केलेल्या आरोपात तथ्य नाही बदनामीचे षडयंत्र आहे.मी पैशाची कुठलीही मागणी केली नाही.सर्व कागदपत्र
तपासून स्वाक्षरी करणार.
-सविता कुळमेथे
नगराध्यक्ष गोंडपिपरी