गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मांतय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी बेडके यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील एम. ए. बि. एड. असलेले मांतय्या बेडके यांचा समावेश आहे.
५ सप्टेबर रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मांतय्या बेडके यांना रजत पदक व ५० हजार रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.