गोंडपिपरी (सूरज माडूरवार): गोंडपिपरी जनता कनिष्ठ महाविद्यालय आणि नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानांतर्गत दि. १३ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. तहसीलदार शुभम बहाकर यांनी जनता कनिष्ठ महाविद्यालय परिसरातून हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला.
रॅलीची सुरुवात जनता कनिष्ठ महाविद्यालयातून झाली आणि ती नगरपंचायतच्या प्रांगणात समाप्त झाली. रॅलीसाठी शिवाजी चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, बाजार रोड या मार्गांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या घोषणांनी वातावरण उत्साही केले.
रॅलीदरम्यान, राष्ट्रीय ध्वजाबद्दल जनतेत आदर वाढावा यासाठी ‘तिरंगा वाचन प्रतिज्ञा’ घेण्यात आली. ‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या माध्यमातून 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले.
या रॅलीत जनता कनिष्ठ महाविद्यालय, कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालय, आणि डी.टी.एड. कॉलेज यांनी सहभाग घेतला. यावेळी प्राचार्य प्रा. विकास कोकाटे, पर्यवेक्षक शांताराम काळे, प्रा. संतोष बांदुरकर, प्रा. प्रशांत नारनवरे, अजय काळे, प्रा. बोबडे, प्रा. तितरमारे, प्रा. मोरे, प्रा. विरुटकर, प्रा. नागपुरे, प्रा. गल्पेल्लिंवार, प्रा. भोयर, प्रा. दिवसे, प्रा. पिंपळकर, प्रा. विवेक काळे, प्रा. ठाकरे, प्रा. वासेकर, प्रा. बेझलवार, प्रा. जीवतोडे, प्रा. साठे व नगरपंचायतचे समन्वयक पाटील आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.
हा उपक्रम राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करण्यासाठी आणि जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी करण्यात आला.