वरोरा (गणेश उराडे): तालुक्यातील पाचगाव येथील शेतकरी वासुदेव शेंडे आणि जनार्धन शेंडे यांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या भीषण आगीने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या आगीत एक बैल मरण पावला, तर तीन बैल गंभीर जखमी झाले. या संकटाच्या वेळी पुण्याई फाउंडेशनने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आणि त्यांना तातडीची मदत पुरवली.
पुण्याई फाउंडेशन ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश खरवडे यांनी आज १३ ऑगस्ट रोज मंगळवरला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. त्यांनी वैद्यकीय अधिकारी गोपाल राठोड यांना त्वरित बोलावून जखमी बैलांची तपासणी करून घेतली. शेंडे कुटुंबाला आर्थिक मदत देऊन त्यांना या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी आधार दिला.
खरवडे म्हणाले, “शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत एकटे सोडणे योग्य नाही. पुण्याई फाउंडेशनने नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे, आणि या संकटाच्या वेळीही आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.”
या प्रसंगी गावच्या सरपंच किरण ढोक, पिंटू सातपुते, मनसेचे राहुल खारकर, सुमित वनकर, वैभव कानस्कर, दीपक मत्ते, अतुल वनकर, भोजराज गौरकर, केदार , नीरज सायंकार आणि इतर पुण्याई फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.पुण्याई फाउंडेशनच्या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.