वर्धा / राहुल मून :- सेवाग्राम पोलिसांनी तीन अट्टल दुचाकी चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून चार दुचाकी असा एकूण १ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नयन मिलिंद गायकवाड( वय १९ राहणार कोसुर्ला ,तालुका हिंगणघाट ,जिल्हा वर्धा ) मोहम्मद फैजन मोहम्मद फिरोज ( वय २० राहणार कामरगाव ,तालुका कारंजा ,जिल्हा वासिम) सैय्यद सलमान सैय्यद साबीर (वय २१ राहणार मसाला ,तालुका कारंजा ,जिल्हा वासिम) अशी अटकेतील दुचाकी चोरांची नावे आहेत .
०६ मे २०२४ ला फिर्यादी अमोल रमेश दारोंडे (वय ४० राहणार मांडवगड तालुका ,जिल्हा वर्धा ) यांनी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे येऊन तक्रार दिली कि ३० एप्रिल २०२४ ला त्याने त्याची जुनी वापरती बजाज कंपनीची पल्सर १२५ डी .टी .सी मोटार सायकल क्रमांक एम एच ३२ ए टी ८४२५ अंदाजे किंमत ५५ हजार घर समोरील अंगणात हॅण्डल लॉक करून ठेवली असता ४.४५ वाजताच दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली .त्या तक्रारी वरून पोलिसांनी अपराध क्रमांक ३४१/२०१४ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा तपासात घेतला .सदर गुन्ह्याचा तपास सुरु असतांना पोलीस स्टेशन आर्वी येथून माहिती मिळाली कि तीन आरोपींना अटक केली असून सदर आरोपींनी सेवाग्राम पोलीस स्टेशन हद्दीतुनही दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . त्यावरून न्यायालयाचे आदेशाने प्रॉडक्शन वॉरंटवर तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली . दरम्यान आरोपी सैय्यद सलमान सैय्यद साबीर
यांच्या घरून जुनी वापरती बजाज कंपनीची पल्सर गाडी जप्त करण्यात आली . तसेच इतर गुन्ह्यातील होंडा शाईन (नंबरप्लेट नसलेली ) , हिरो स्प्लेंडर प्लस (नंबर प्लेट नसलेली ) दोन दुचाकी वाहने असा एकूण १ लाख ६५ हहजरचा मुद्देमाल आरोपी कडून जप्त करण्यात आला . सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नरुल हसन , अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार विनीत घागे यांचे सह पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील पोलीस अंमलदार हरिदास काकड , गजानन कठाणे , अभय इंगळे , सचिन सोनटक्के ,मंगेश झांबरे , संजय लांडे , मंगेश तारले यांनी केली .