पुलगाव :- येथील शासकीय विश्रामगृहासमोर असलेले फ्रेंड्स पान ठेल्यावर झालेले वादात पुलगाव पोलिसांनी दोन्ही गटावर गुन्हा दाखल केला असून दोन्ही गटाचे इमरान इक़बाल शेख, शेख वसीम तर दुसऱ्या गटाचे विकास ऊर्फ़ विक्की पाखरे, आकाश चांडाले यांच्यावर कलम 504, 294, 506, 504, 34भा. दा. वी प्रतिबंधित कार्रवाई केली आहे. ही घटना दिनांक 14 जूनला रात्रि 10ते 11वा दरम्यान घडली. विक्की पाखरे आणि इमरान शेखचा भ्रमणध्वनीवर वाद झाला. त्या वेळी विक्की कारंजा (तळेगाव )इथे होता. विक्कीने तेथुनच पुलगाव पोलिसला फोनवर सुचना दिली कि इमरान शेख मला फोन वर शिविगाळ करून धमकी देत आहे. मी पुलगावला पोहोचून त्याला भेटतो. विक्की येण्याआधी पुलगाव पोलिस तेथे पोहचली. पुलगाव S. D. P. O रजेवरअसल्याने आर्वी s. D. P. O नी पुलगावला पोहोचुन परिस्थिति हाताळून,. दोनों गटाचे आक्रोश पाहून पुलगाव येथे वर्धा येथून दंगल निर्यत्रण पथक पुलगाव येथे बोलविण्यात आले. पुलगाव पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे आणि स्थिति शांत आहे.