तळोधी (बा ): प्रतिनिधी.
रात्रीच्या सुमारास घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना घराच्या मागील दरवाज्याची कडी काढून ३२ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना दि.१० जून रोजी रात्रौ अंदाजन दिढ वाजताच्या सुमारास नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे घडली.चोरी झालेल्या घरमालकाचे नाव अनिल योगेश्वर ठिकरे (वय ४३)असे आहे.
तळोधी बा.पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील चोरी प्रकरणात फिर्यादीने दाखल केलेल्या तोंडी तक्रारीनुसार अनिल योगेश्वर ठीकरे यांच्या घरातली सर्व सदस्य रात्रीचे जेवण आटोपून गाढ झोपी गेले होते. दरम्यान रात्रीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाज्याची कडी काढून घराच्या आत प्रवेश केला.आणि कपाट खोलून अडीच ग्रॅम सोन्याची नथ,दीढ ग्रॅम वजनाचा सोन्याचा डोरल,एक ग्रॅम वजनाची सोन्याची जिवती, एक ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे रिंग व नगदी २ हजार पाचशे रुपये असा एकूण ३२ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख अज्ञात चोरांनी लंपास केली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध तळोधी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजितसिंग देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर व सहकारी करीत आहेत.