चिमूर प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरात दिनांक 26 मे ला सायं सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जोरदार चक्रीवादळामुळे अनेक घराच्या टीना छप्पर तसेच झाडांची मोडतोड झाल्या मुळे बरीचशी नुकसान झाली आहे.
या चक्रीवादळामुळे जवराबोळी येथील अनेक घराच्या टीना उडल्या तर जवराबोळी शंकरपूर रोडवर झाडे पडल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ बंद पडली. तसेच शंकरपूर येथे सुद्धा आंब्याचे झाडे तसेच जांभळी चे झाडे पडल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेच प्राथमिक स्वास्थ्य केंद्र शंकरपूर येथे सुद्धा झाडाची बऱ्याच प्रमाणात मोडतोड झाली.
या चक्रीवादळामुळे शंकरपूर तसेच परिसरातील विद्युत तारा तुटल्याने परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद पडला. त्यामुळे शंकरपूर तसेच परिसरातील गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.