मूल : शासनाने निराधार,अपंग,वृद्धलोकांसाठी संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्याची योजना कार्यन्वित केली आहे.त्या अनुषंगाने मूल तालुक्यात असलेल्या संजय गांधी निराधार समितीची दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ ला मासिक आढावा सभा वंदना अगरकाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विविध योजनांचे अर्ज मंजूर करण्यात आले.श्रावणबाळ- ८४ प्रकरणे,वृद्धापकाळ-१३ प्रकरणे,संगायो निराधार -४७ प्रकरणे,इंगायो विधवा-18प्रकरणे,इंगायो अपंग-०० असे एकूण १६२ प्रकरणे मंजूर करण्यात आले.साधक बाधक चर्चा झाली.यावेळी वंदना अगरकाटे अध्यक्ष ,पूजा डोहने सदस्य,उर्मिला कडस्कर सदस्य,राकेश ठाकरे सदस्य मुन्ना कोटगले सदस्य,अनुप नेरलवार सदस्य,दिलीप पाल सदस्य,नितीन गुरनुले सदस्य,नामदेव कावळे सदस्य,नायब तहसीलदार संगायो मूल, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल,मुख्याधिकारी नगरपरिषद मूल उपस्थित होते.