वर्धा (अविनाश भोपे) :- जिल्यातील आर्वी तालुक्यातील विरूळ परीसरात असलेल्या सालफळ येथील कॅनल मध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २८ फेब्रुवारीला सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली.
सालफळ येथील अरविंद मधुकर कोहळे वय 55 व चेतन अरविंद कोहळे 18 हे दोघे बापलेक कॅनल जवळील शेतात पाण्याचे ओलित करीत होते.ओलीत संपल्यावर मुलगा चेतन हा पाय धुण्यासाठी कॅनल वर गेला व पाय घसरून कॅनल मध्ये पडला.त्याला वाचविण्यासाठी वडील अरविंद कोहळे हे गेले असता दोघही बापलेक कॅनलच्या पाण्यात बुडाले व या घटनेत दोघाही बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.रात्री उशिरापर्यंत बापलेक घरी न आल्याने गावातील पन्नास साठ लोक शेताच्या रस्त्याने निघाले असता त्यांना बैल एकटेच येतांनी दिसले नंतर शेताजवळ जाऊन पाहता तर त्या दोघांच्याही चपला कॅनेल च्या जवळ दिसल्याने गावकऱ्यांना ही माहिती होताच घटना स्थळावर गावकऱ्यांनी धाव घेतली व दोघा ही बापलेकाचा शोध सुरू झाला असतां रात्री अकरा वाजता वडीलांचा म्रुतदेह सापडला तर मुलाचा २९ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता च्या सुमारास म्रुतदेह सापडला.याबाबत पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली असुन पोलिसांनी दोन्ही मृतदेह पुलगाव येथै सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले. या दुर्देवी घटनेने विरूळ परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आ.हे पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे.