नागपूर (प्रतिनिधी)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली मराठी प्राध्यापक परिषदेचे ३४ वे अधिवेशन येत्या १९ व २० जानेवारी २०२४ ला डाॅ. मधुकरराव वासनिक पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालय, नागपूर येथे होत असून या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक-समीक्षक, रा.तु.म.नागपूर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि श्री बिंझाणी नगर महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक डाॅ. राजेंद्र नाईकवाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्राध्यापक परिषदेच्या अलीकडेच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निवडीनिमित्त परिषदेचे अध्यक्ष व इतर पदाधिका-यानी दि. २ जानेवारी २०२४ ला डाॅ. राजेंद्र नाईकवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला. नागपूर व गोंडवाना विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेची आजवर ३३ अधिवेशने संपन्न झाली असून १९६८ मध्ये वणी येथे झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डाॅ. मा.गो.देशमुख हे होते. त्यानंतर सातत्याने दरवर्षी अधिवेशनांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये आजवर भ.श्री. पंडित, श्री.मा.कुळकर्णी, डाॅ. अ.ना. देशपांडे, डाॅ. द.भि.कुलकर्णी, डाॅ. मदन कुलकर्णी, डाॅ. वि.स.जोग, आचार्य अ. द. वेलणकर, डाॅ. अक्षयकुमार काळे आदि अनेक समीक्षक – प्राध्यापकांनी अधिवेशनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत.
यावर्षी १९ व २० जानेवारी २०२४ ला नागपूरच्या पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालयात होणा-या द्विदिवसीय अधिवेशनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ. राजेंद्र नाईकवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. गणेश मोहोड, सचिव डॉ. राजेंद्र वाटाणे, मार्गदर्शक डॉ. सत्यवान मेश्राम, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. हिराजी बनपुरकर, मागील वर्षीचे अधिवेशनाध्यक्ष प्रा. श्रीकांत नाकाडे, कोषाध्यक्ष डॉ. सोपानदेव पिसे, ३४ व्या अधिवेशनाच्या मुख्य संयोजक डॉ. मनीषा नागपुरे, सहसंयोजक डॉ. अमृता डोर्लीकर, नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख व परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. शैलेंद्र लेंडे, उपाध्यक्ष डॉ. सुदर्शन दिवसे व डाॅ. अजय कुळकर्णी, सहसचिव डॉ. संगीता खुरद, प्रसिद्धी प्रमुख डॉ. यशवंत घुमे, डॉ. विजय राऊत, डॉ. प्रवीण घारपुरे, डॉ. अंजली पांडे, डॉ. रामलाल चौधरी, डॉ. राखी जाधव, डॉ. नरेंद्र घरत, डाॅ. प्रशांत सूर्यवंशी हे सर्व परिषदेच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी, तसेच राजेंद्र यांच्या पत्नी सौ. सीमा आणि मोठे बंधू प्रकाश नाईकवाडे उपस्थित होते.