घुग्घुस :- शहरातील सर्व धार्मिक स्थळ आणि बगीचाच्या ठिकाणी सीसीटीवी कॅमेरा लावा अशी मागणी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी निवेदनातून केली आहे.
घुग्घुस शहरात नागरीकांसाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून आणि माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्यातून दहा बगीचांची निर्मिती करण्यात आली. तसेच शहरामध्ये विविध धार्मिक स्थळे आहे. भारतीय संस्कृतीत धार्मिक स्थळाना पवित्र माणल्या जाते. परंतु समाजकंटक धार्मिक स्थळाची विटंबना करतात. तसेच बगीचाच्या साहित्याची तोडफोड करून चोरीस जाते.
या सर्वावर आळा घालण्यासाठी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी शिष्टमंडळासह नगर परिषद कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली व चर्चा करून मागणीचे निवेदन दिले.
यावेळी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे, भाजपाच्या सुषमा सावे, अमीना बेगम, पुष्पा रामटेके, माधुरी चोखांद्रे, सुधा उरकुडे, सुनीता घिवे, शोभा माकोडे, शुभश्री किन्हेकर, विमल इंगोले, प्रियांका मोहजे, पपीता धोंगळे, अश्विनी कपाटे, सुनंदा लिहीतकर, स्वाती गंगाधरे व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.