मूलचेरा : मलेझरी येथील भगीरथ जुनघरे यांची घरची परिस्थिती हलाकीची असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते दरवर्षी बाहेर गावी जाऊन मोलमजुरी करून आपले घर चालवायचे,असच मोल मजुरी करण्यासाठी ते बाहेर राज्यात गेले असता त्यांचा अपघात झाला.त्या अपघातात त्यांचा एक पाय कापावा लागला,एक पाय कापल्यामुळे त्यांचे कुटुंब संकटात सापडले आहे ही बाब मलेझरी येथील पदाधिकाऱ्यानी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक आत्राम यांना माहिती देताच त्यांनी अपघात ग्रस्ताच्या घरी जाऊन आस्तेने विचारपूस करून त्यांना आर्थिक मदत दिली.
आर्थिक मदत करते वेळी सेवानिवृत्त तहसीलदार कुबडे,वेलगुर ग्राप उपसरपंच उमेश मोहूर्ले,डॉ अंकित झाडे,ग्रा.प.सदस्य विजय मांदाळे,ग्रा.प.सदस्य संदीप चौधरी,ग्रा.प.सदस्य विनोद झाडे,आविस जेष्ठ सल्लागार रामचंद्र शेडमाके,आविस जेष्ठ सल्लागार भगीरथ गायकवाड,साईनाथ नागोसे,किशोर नेवारे,रामदास सिडाम,वामनराव कंन्नाके, रामदासजी कोसनकर,किसन येलमुले,बंडू चांदेकर,तुफिन गायकवाड, आकाश नागोसे, दिपक शेडमाके,मारोती मडावी,प्रणय शेडमाके सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.