पुलगाव – येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शकील खान शेरखान यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्च्याच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांनी ही घोषणा केली.
नवनियुक्त अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव शकील खान यांनी आपल्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,अल्पसंख्यांक मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष जमालभाई सिद्धिकी, प्रदेश अध्यक्ष ईद्रीस मुलतानी,प्रदेश महामंत्री जुनेद खान,ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष संजय गाते, खा. रामदास तडस, जिल्हा अध्यक्ष सुनिल गफाट,आ.रामदास आंबटकर, राजेश बकाने यांचे आभार मानले आहे. भारतीय जनता पार्टीत अल्पसंख्यांक समाजाला मोठया प्रमाणात समाविष्ट करून अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निरंतर प्रयत्नशील राहील, असे मनोगत यावेळी शकील खान यांनी व्यक्त केले. शकील खान यांचे ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष मंगेश झाडे, प्रदेश सदस्य राजीव बत्रा, चंद्रशेखर बेले, संदीप बोरकुटे, हाजी निसार अहमद, राजेश गुप्ता, सलमान पठाण, नियाज अली, अनिल लेकुरवाळे, शारिक अली, गजानन सरदार यांनी अभिनंदन केले आहे.