मागील दोन वर्षापासून संपूर्ण जगासोबत आपल्या देशात सुद्धा कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाने अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना हा अति वेगाने संक्रमित होणारा आजार असून एखाद्या व्यक्तीस कोरोना झाला आहे असे कळताच दूरचे ते तर सोडा जवळचे नातेवाईक सुद्धा त्याच्या जवळ जाण्यास हिंमत करत नव्हते अशा वेळी रुग्ण सेवेमध्ये काम करत असताना कोरोना आपल्याला होईल व आपला सुद्धा मृत्यू होऊ शकतो हे माहीत असून सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर परिचारिका तसेच सफाई कामगार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवे मध्ये स्वतःला वाहून घेतले अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले असले तरी अनेकांना यांनी कोरोना पासून मुक्ती मिळवून दिली . रुग्णसेवे मध्ये अनेक डाँक्टर व वैद्यकिय कर्मचारी कोरोनाने बाधित होवून मृत पावले. देवाचे देवालय भक्तां करता बंद असताना आरोग्य मंदिर हे खुले होते. आणि रुग्णांसाठी ते धावून आले त्यांच्या कार्याची एक समाजाचा घटक म्हणून व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी वरोरा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते ॲड. गौरव स्वामी यांनी वैद्यकीय अधीक्षक अंकुश राठोड व त्यांच्या इतर डॉक्टर स्टाँफ व ईतर कर्मचाऱ्यांना व्हॅलेंटाईन दिवसाचे निमित्त साधून त्यांच्यासोबत सर्व कर्मचाऱ्यांना प्रेमाचे प्रतीक गुलाब पुष्प व मिठाई देऊन अभिनंदन व शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त केली.













