बीड :- धारूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना साठी 27 लाख रुपये मंजूर झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले .धारूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणार्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारतीची अतिशय दुरावस्था झाली होती. इमारतीच्या नवीन बांधकामासाठीशेतकऱ्यांनी मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा नियोजनातून इमारतीच्या बांधकामासाठी 27 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत केले जात आहे . पशुधनाच्या आरोग्याच्या काळजीसाठी प्रशासनाच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात आला. मात्र या इमारतीला प्रदीर्घकाळ झाल्याने इमारतीची अतिशय दैनावस्था झाली होती. याबाबत अनेक नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनीही या इमारतीच्या बांधकामासाठीप्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्या कडे मागणी केली होती. पशुवैद्यकीय दवाखाना जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा नियोजनातून 27 लाख रुपये मंजुरी देण्यात आली आहे .त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे