गोंडपिपरी (सुरज माडुरवार) : नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला. त्यात गोंडपिपरी तालुक्यातील चेक लिखितवाडा येथील मंगल हरीदास मडावी याने नीट परीक्षेत सुयश मिळवले.
वडील अल्पभूदारक शेतकरी, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची. अशा परिस्थितीत त्याचे प्राथमिक शिक्षण लिखितवाड्या सारख्या ग्रामीण भागात झाले आहे. त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्ज काढून वडिलांनी त्याला नागपूरला उच्च शिक्षणासाठी पाठवले. आपल्या परिस्थितीची आणि आई वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमाची जान ठेवत मंगलने जिद्दीने यश प्राप्त करत नीट परीक्षेत सुयश मिळवले .गावाची लोकसंख्या जेमतेम ९०० च्या आसपास आहे. त्यामुळे चेक लिखितवाडा या छोट्याशा खेडेगावातील हा गरीब घरातील मुलगा डॉक्टर होणार असल्याने समस्त गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.मंगलने आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना आणि शिक्षकांना दिले.