परळी(बीड) माजी मंत्री पंकजा मुंडे व खा.डॉ प्रितम मुंडे यांच्या सुचनेनुसार व .आ.रमेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचा श्रीराम मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
बॅंक कॉलनी येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन श्रीराम मुंडे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
बॅंक कॉलनी येथील रहिवाश्यांच्या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे, येणाऱ्या काळात पंकजाताई व खा.डॉ प्रितमताई यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रश्न मार्गी लावु असे प्रतिपादन श्रीरामजी मुंडे यांनी भूमिपूजन प्रसंगी केले.मा.श्रीरामजी मुंडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
रस्ता भूमिपूजन कार्यक्रमास श्रीरामजी मुंडे, गोवर्धन कांदे सरपंच जिरेवाडी, शिवाजी मुंडे उपसरपंच,विलास बापू मुंडे, सतिश फड, खामगावकर काका,सातपुते सर, शिवाजी खाडे ,उमेश खाडे,नामदेव सातपुते ,अच्युत जोगदंड,भुजनंगे काका, माऊली फड पैलवान,प्रकाश मुंडे,प्रल्हाद गित्ते, रामहरी फड,प्रशांत रोडे,अमोल रोडे, वैजनाथ आंधळे,ज्ञानेश्वर मुंडे, चैतन्य मुंडे, संतोष शिरसागर,आर्यन गुंजावले,अक्षय खाडे,लक्ष्मण खाडे,अभिजीत सातपुते विश्वजीत बोंधे व बॅंक कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व नागरिकांचे महादेव कंडुकटले यांनी स्वागत केले व कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.