गोंडपिपरी(सुरज माडुरवार) :- सध्या स्थितीत घर बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू असून अशाच एका घर बांधकाम करताना घरावरून पडल्याने मजूर जखमी झाल्याची घटना दि.(२३) शुक्रवारी घडली.यावेळी मजुर जखमी झाल्याने त्याला मिस्त्री संघटनेने नुकतीच आर्थिक मदत केली.
गोंडपिपरी येथील श्री विश्वकर्मा राज मिस्त्री बहुद्देशीय नोंदणीकृत संस्थेचे मजूर भाऊराव भिकाजी बावणे हे घरबांधकाम करताना पडल्याने हाताला जबर मार लागला घटनेचे दखल घेत विश्वकर्मा राज मिस्त्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जखमी मजुराची भेट घेऊन त्याच्या वेदनेवर मायेची फुंकर घालत रोख ५ हजाराची आर्थिक मदत केली.यावेळी शंकर सोनटक्के,सुरेश पेदिलवार,रामदास कोसरे, अनिल झाडे,विश्वनाथ भोयर,भैय्याजी कोहपरे,घनशाम नुतीलकंटावार,राजू देवगडे,संजय निकोडे,शामा चौधरी,तामदेव बोरकुटे यांची उपस्थिती होती