गोंडपिपरी :- एकीकडे शासन आरोग्य व्यवस्थेवर हजारो कोटीचे बजेट अर्थसंकल्पात घोषणा करतात.तरतुदीही करतात.परंतु चक्क रुग्णवाहिकेत डिझेल टाकण्यासाठी पैसे नसल्याने गर्भवती महिला तब्बल एक तास पेट्रोल पंपावर अडकल्याचा धक्कादायक प्रकार गोंडपिपरी तालुक्यात घडला.
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते.या आरोग्य केंद्रात तीन एमबीबीएस वैधकीय अधिकारी असून त्यापैकी एक अधिकारी कधिच मुख्यालयी राहत नाही.ते चंद्रपूरवरून येजा करतात.अशातच मंगळवारी(दि.३०) धाबा येथील गर्भवती महिलेला त्रास जाणवायला लागला.प्रकृती गंभीर असल्याने योग्य उपचार व्हावा,यासाठी मोनिका रामदास तांगडपलेवार यांना चंद्रपूर रेफर करन्यात आले.धाबा आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका निघाली.गोंडपिपरी येथिल पेट्रोल पंपावर त्यांचा नियमित व्यवहार सुरू असतो.मात्र डिझेलचे पैसे वेळेवर न मिडाल्याने उदारीवर डिझेल टाकण्यासाठी पंपचालकाने नकार दिला.रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याने पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी तब्बल एक तास लागला.यादरम्यान गर्भवती महिलेसह रुग्णवाहिका पेट्रोल पंपावर अडकून राहिली.त्यानंतर तालुका वैधकीय अधिकारी डॉ.दिनेश चकोले यांनी पैशाची व्यवस्था केल्यानंतर रुग्णवाहिका चंद्रपूरसाठी रवाना झाली.जननी सुरक्षा योजना,जननी शिशु सुरक्षा योजना अशा अनेक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध असतांना रुग्णवाहिकेला डिझेल अभावी गर्भवती महिलेचा जीव आरोग्य विभागाने धोक्यात टाकला.यामूळे तालुक्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.अधिकाऱ्यांना याबाबतीत विचारले असता आर्थिक व्यवहारासमंधी कनिष्ठ लिपिक पद रिक्त असल्याने व पंचायत समिती स्तरावर बिल रखडला असल्याने हा प्रकार घडल्याची माहिती दिली.कर्तव्यावर कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार,याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही जबाबदार अधिकारी मुख्यलयी राहत नाहीत चंद्रपूरवरून येणे जाणे करतात त्यांनाच्यावर प्रशासन मेहरबान दिसत आहे.डिझेल टाकायला पैसे नाही.गर्भवती महिलेला पेट्रोल पंपावर एक तास तातकळत राहावे लागले हा नागरिकांच्या जीवाशी होत असलेला खेळ थांबवाव.हा संपूर्ण प्रकार गंभिर आहे.याची चौकशी करुण मुख्यालयी न राहनाऱ्या धाबा आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांवर कार्यवाही करावी.
– सुरज माडूरवार,तालुकाप्रमुख शिवसेना(उबाठा)गोंडपिपरी.