मूल: 19 सप्टेंबर रोजी चिंचोली येथे वाघाच्या हल्ल्यात देवाजी बाबुराव राऊत (62) यांचा मृत्यू झाला. हा या महिन्यातील दुसरा हल्ला असून, जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काँग्रेस नेत्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी वारंवार मागणी करूनही वनविभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. वाघाच्या हल्ल्यांमुळे शेतकरी व गुराखींच्या जीवावर संकट निर्माण झाले आहे, मात्र प्रशासन केवळ निवेदनांवरच वेळ घालवतेय. जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही वनमंत्री या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार भूमिपुत्र ब्रिगेडने केली आहे.
या मोर्चात काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष नामदेवराव गावतुरे, समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, छाया सोनुले, सीमा लोणबुले, विक्रम गुरनुले, नितेश म्याकलवार, राकेश मोहूर्ले, संतोष चिताळे, कालिदास गायकवाड, दिवाकर चौधरी, दामोदर किनाके, सुखदेव मगरे, वामन सोनवणे, संतोष गायकवाड, समीर उमरकर, विश्वनाथ चचाटे, कोंडू घरत, भोजराज कोवे, रामदास सीडाम, संजय नागपुरे, दिलीप चौधरी, भाऊजी नेवारे, बंडू बावनवाडे, दीपक राऊत, सचिन मुंडवार, जोगेश्वर ठाकरे, मारुती मगरे, करण ठाकरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.