गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाकरिता आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जवळपास पंधरा कोटी रूपयाच्या विकासाची कामे मंजूर झाली आहेत.आज तालुक्यातील अनेक गावात त्यांच्या हस्ते विकासकामाचं भुमीपुजन कार्यक्रम संपन्न झाला.गोंडपिपरी तालुक्याच्या विकासासाठी आपण सदैव तप्तर असल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार सुभाष धोटे ंयानी केले.
आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नातून विविध गावात जवळपास पंधरा कोटी रूपयाच्या विकासकामांचे भुमिपूजन आज करण्यात आले यावेळी ते बोलत होते.आमदार सुभाष धोटे यांच्या समवेत यावेळी तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे,कार्याध्यक्ष निलेश संगमवार,देवेद्र बटटे,देविदास सातपूते,अशोक रेचनकार,राकेश पून,नितीन धानोरकर,नितेश मेश्राम,संतोष बंडावार,तुकेश वानोडे,श्रिनीवास कंदनुरीवार,सरपंच मिनाक्षी खरकनकार,तरूण उमरे,खेत्री पाटील देवाडे,बालाजी चापले,महेद्र कुनघाटकर,हरिदास मडावी,पुष्पा राऊत,प्रतिमा चंद्रगिरीवार,प्रभाकर कोहपरे,माया कोहपरे,कोवे व अनेक गावातील सरपंच,उपसरपंच तथा सदस्य उपस्थित होते.यावेळी
आक्सापूर,चेकपेलूर,चेकबेरडी,वडकूली,चेकलिखीतवाडा,तारडा,भनारहेटी,गणेशपिपरी,चेकपिपरी,अडेगाव,पानोरा,शिवणी,चेकदरूर,दरूर किरमीरी,सोमनपल्ली,गोजोली या गावामध्ये पाणीपूरवठा,सिमेंट काॅकी्रट रोड,ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम व इतर अशा एकून पंधरा कोटी रूपयाच्या विकासकामांचे भुमीपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते संपन्न झाले.