गडचिरोली:- होळीनिमित्त आपल्या स्वगावी गेलेल्या युवकाची माओवाद्यांनी हत्या केल्याची घटना आज 10 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.जिल्हा मुख्यालयात पदवीचे घेणाऱ्या आदिवासी युवकाची हत्या करून भामरागड तालुक्यात माओवाद्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच तालुक्यात पोलीस महासंचालक रजनीश सेठ जाऊन आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधले आहे.
नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येत असलेल्या मर्दहूर येथील 26 वर्षीय युवक नामे साईनाथ नरोटे हा गडचिरोली जिल्हा मुख्यालयात पदवीचे शिक्षण घेत होता.तो होळी निमित्त आपल्या स्वागवी म्हणजे मर्दहूर येथे आला होता.माओवाद्यांनी गुरुवार (9 मार्च) रोजी रात्रीच्या सुमारास गोळ्या जाळून हत्या केली.ही घटना शुक्रवार (10 मार्च ) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
दरम्यान राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यांनी त्याच भामरागड तालुक्यातील तलवाडा पोलीस मदत केंद्राला भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधून पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून त्यांना साहित्य वाटप केले तसेच येथील नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनही केले. विशेष म्हणजे तलवाडा ते मर्दहुर या गावाचा अंतर जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर आहे. शुक्रवारला या घटनेची माहिती मिळताच तालुक्यात एकच दहशत पसरली होती. मात्र,अशाही परिस्थितीत पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी तलवाडा पोलीस मदत केंद्राला भेट दिली.यावेळी त्यांनी भव्य जनजागरण मेळावाही घेतला.
या जनजागरण मेळाव्यात पोलीस सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई शिरीष जैन,गडचिरोली परीक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली से पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच स्थानिक पोलीस अधिकारी व शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.त्यानंतर त्यांनी मन्नेराजाराम येथील पोलिस मदत केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
*पोलीस उप मुख्यालय प्राणहिता येथे दिली भेट*
भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस मदत केंद्राला भेट दिली यावर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी अहेरी तालुक्यातील पोलीस उप मुख्यालय, प्राणहिता येथे भेट देऊन सी-60 कमांडो यांची दरबार घेतली.नक्षल पिढीत कुटुंबियांशी आस्थेने संवाद साधून समस्या जाणून घेतली.दरम्यान प्राणहिता येथे आगमन होताच अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या भेटीमुळे नक्कीच सी-60 कमांडोंची मनोबल उंचावली आहे.