गडचिरोली: अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांच्या हस्ते ४ मार्च रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने “पोलीस दादालोरा खिडकी”च्या माध्यमातुन उपपोस्टे व्येंकटापुर येथे आयोजीत केलेल्या जनजागरण मेळावा व नविन इमारतीचे उदघाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी पोलीस उप महानिरीक्षक संदिप पाटील,पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अमोल ठाकुर उपस्थित होते.
यावेळी उपस्थतीत नागरिकांशी संवाद साधतांना गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारच्या विविध योजना उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच कुठल्याही प्रकारची समस्या असल्यास पोलीस विभागाला कळविण्यात यावे व शेतीच्या माध्यमातुन गावाचा विकास करण्याचे आव्हान केले व नविन पिडीतील युवक,युवतींना उच्च शिक्षण घेण्याकरीता मार्गदर्शन केले.
यावेळी उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे व्यंकटापुर भागातील ३५० आदिवासी बांधव उपस्थीत होते. उपस्थीत आदिवासी बांधवांना कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे साहित्यांचे वाटप करण्यात आले असुन त्यात शिलाई मशील,स्प्रे पंप, औषधी पवारणी, मच्छर दाणी, दिव्यांग बांधवांना सायकल,वाचनालय साठी पुस्तक व नोट बुक आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाच्या यशस्तीतेसाठी उपपोस्टे व्येंकटापुर प्रभारी अधिकारी संजय कुकलारे व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
*४७४१ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण*
आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ५१२, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पालिटी ३१४, ऑटोमोबाईल २७६ ईलेक्ट्रीशिअन १६७, प्लम्बींग ३५, वेल्डींग ३८, जनरल ड्युटी असिस्टंट ३१४, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२ असे एकुण २९७७ गडचिरोली जिल्ह्यातील युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १४०, कुक्कुट पालन ५३१, बदल पालन १००, शेळीपालन ८०, शिवणकला २४२ मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड १३९५, पोलीसभरती पुर्व प्रशिक्षण १०६२, टु व्हिलर दुरुस्ती ६४, मत्स्यपालन ८७, फास्ट फुड ६५, पापड लोणचे५९, कराटे प्रशिक्षण ४८, असे एकुण ४७४१ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.