गोंडपिपरी (सुरज माडूरवार)
तेंदुपत्ता संकलनाला गेलेल्या 62 वर्षीय महिलेवर अस्वलाचा हल्ला गोंडपिपरी – तेंदुपत्ता संकलन साठी जंगलात गेलेल्या एका 62 वर्षीय महिलेवर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना गोंडपिपरी तालुक्यातील सोमणपल्ली येथे घडली.जखमी महिलेचे नाव इंदुबाई तुळशीराम इजमनकर असे असून तिला उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने गावागावात तेंदुपत्ता संकलन करण्याचे काम सुरू झाले आहे. खाली दिवसात चार पैसे कमविण्यासाठी गावातील नागरिक हे पहाटेच्या सुमारास तेंदुपत्ता संकलन करून रात्री फडी वरती विकायला जातात.अश्यातच आज दिनांक ५ मे रोजी सकाळी ७.०० वाजता सोमणपल्ली येथील इंदुबाई तुळशीराम इजमनकर वय (६२) यांच्यासोबत गावातील काही महिला धाबा वन परिक्षेत्र क्रमांक १३३ येथे तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले असता दबा धरून असलेल्या अस्वलाने इंदुबाई यांच्यावराती हल्ला केला. घाबरलेल्या अवस्थेत सोबत असलेल्या महिलांनी कसेबसे अस्वलाला पळवून लावले.यात इंदुबाई यांच्या डोक्याला,मानेला तसेच पायाला जबर दुखापत झाली.घटनेची माहिती होताच तबोडतोब ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले.वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. वणपाल एम. एन. गंदलवाड यांनी ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन वरिष्ठांना घटनेचे माहिती दिली.प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.