वरोरा:- महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (MANAGE) , हैद्राबाद, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था,( वनामती), नागपूर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, ( आत्मा), चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा मध्ये ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण (STRY) अंतर्गत फळे भाजीपाला प्रक्रिया व मूल्यवर्धन या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ दि. 6 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात पार पडला.
या प्रशिक्षणा अंतर्गत 18 ते 40 या वयोगटातील युवकांना फळे व भाजीपाला प्रक्रिया व मूल्यवर्धन यातील संधी, विविध प्रक्रिया युक्त पदार्थ यांचे प्रात्यक्षिक, विविध शासकीय योजना इत्यादी संबंधित मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण हे 6 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत होत असून या प्रशिक्षणात एकूण 28 प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात आली आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार , तसेच प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर कडू ,विश्वस्त महारोगी सेवा समिती, प्रमुख वक्ता डॉ. नीलिमा पाटील, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली व कार्यक्रम संयोजिका मिली पुसदेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे डॉ. अनिल भोगावे यांनी केले.