भद्रावती :- स्थानिक निळकंठ राव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप स्व मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा येथे संपन्न झाला
या शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके विशेष अतिथी धनराज आस्वले माजी प्राध्यापक बेहरीन गल्फ प्रमुख अतिथी डॉ. जयंत वानखेडे प्राचार्य यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती, डॉ. विजया गेडाम चंद्रपूर जिल्हा रा से यो समन्वयक विकास जीवतोडे उपसरपंच चोरा एम यु बरडे मुख्याध्यापक स्व मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागताने व प्रांजली बिश्वास हिच्या स्वागत गीताने व विभा तातेड प्रांजली रायपुरे व तन्वी झोडे यांच्या एन एस एस गीताने झाली
सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा गजेंद्र बेदरे यांनी आपल्या प्रस्ताविकेतून या सात दिवसीय शिबिराचे दिनचर्या व शिबिरा दरम्यान घेण्यात आलेले विविध उपक्रम व बौद्धिक कार्यक्रम यांची सखोल माहिती दिली
याप्रसंगी धनराज आस्वले यांनी उपस्थितांना महात्मा गांधी यांच्या खेड्याकडे चला या नाऱ्याचे महत्त्व विशद केले त्यात त्यांनी खेड्यांचा विकास महत्त्वाचा विकास करताना सर्वांनी स्वार्थ बाजूला ठेवणे आवश्यक आहे तसेच आज आपला देश विकसीत देशाच्या बरोबरीत घेण्याचा प्रयत्न करीत आहे त्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे तसेच आपला भारत देश तरुणांचा देश आहे आजच्या तरुण पिढीने आपले ध्येय निवडलेले पाहिजेत व तसा प्रयत्न केला पाहिजे असे आपले मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी या शिबिरात उपस्थित विभा तातेड व साहिल लांडगे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी अशा प्रकारच्या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होते त्या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला पाहिजे त्यामुळे आपला अनुभव वाढतो व आपल्या परिपक्वता येते जर आपण प्रयत्न केले तर यशाचे दार आपल्यासाठी उघडते अशा प्रकारचे मार्गदर्शन उपस्थिती विद्यार्थ्यांना केले
तसेच डॉ विजया गेडाम राष्ट्रीय सेवा योजना चंद्रपूर जिल्हा समन्वयक यांनी शिबिरात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना चांगली शिस्त लागते त्यामुळे त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो तसेच ते विद्यार्थी स्वावलंबी बनतात व त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे आपले विचार व्यक्त केले
एम यु बरडे मुख्याध्यापक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एकमेकास मदतीचे आवाहन केले
विकास जिवतोडे उपसरपंच चोरा यांनी विद्यार्थ्यांना पुढील भविष्याकरिता शुभेच्छा देत पुढील वर्षी सुद्धा चोरा येथे येण्याचे निमंत्रण दिले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगण्याचा मोलाचा मंत्र देत या शिबिरात आलेल्या चांगल्या अनुभवाचा जीवनात वापर करावा असे आवाहन केले
या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी गजेंद्र बेदरे तर आभार प्रदर्शन सचिन श्रीरामे यांनी केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा संदीप प्रधान डॉ सौ किरण जुमडे डॉ अपर्णा धोटे प्रा कुलदीप भोंगळे प्रा अमित पवार शरद भावरकर यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला विद्यार्थी व बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते.