चंद्रपूर :- भद्रावती शहरातील मच्छीमारां मच्छूआ सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखडे यांच्या निदर्शनास आणून देतास आकाश वानखडे यांनी तात्काळ कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत आज (१३ जानेवारी) जनसंपर्क कार्यालय गिरनार चौक चंद्रपूर येथे बैठक लावून यांच्या समस्येबाबत अवगत केले. यावर मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील अद्यावत असे मच्छी मार्केट भद्रावती येथे उभारू असे आश्वासन देऊन तात्काळ मच्छी मार्केट बांधण्या संदर्भात आदेश देण्यात आले.
याबाबत मच्छिंद्र मच्छीमार सहकारी संस्था व भद्रावती येथील मच्छीमार बांधवांकडून कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानण्यात आले.यावेळी रुपेश मांढरे, आशिष कार्लेकर, अनंता मांढरे, मनोहर नागपुरे, संतोष नागपुरे, सुनील पारशिवे, योगेश नागपुरे, सुरज पेंदाम,आकाश नागपुरे व असंख्य मच्छिमार बांधव उपस्थित होते.