वरोरा : स्थानिक राजर्षी शाहू कॉन्व्हेंट येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारच्या वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत बालगोपालांनी आपल्या पालकांच्या मदतीने विविध प्रकारच्या वेशभूषेत येऊन कार्यक्रमात भाग घेतला. या वेशभूषांच्या माध्यमातून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळाला. त्यातून त्यांच्या बालमनावर महापुरुषांच्या कार्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संस्कार करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी झाल्याने बालगोपाळांमध्ये मोठ्या प्रकारचा उत्साह दिसत होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनंदा पिदूरकर होत्या. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षिका विद्या झाडे, साक्षी कुमरे आणि राणी प्रधान यांनी विशेष सहकार्य केले. हा सोहळा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक आणि नागरिक उपस्थित होते. विजेत्यांना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली.