गोंडपिपरी(चंद्रपूर) :-देशाचे पंतप्रधान, संपूर्ण देशात कोरोना महाराष्ट्र काँग्रेसमुळे वाढला असा आरोप संसदेत केला आहे. केवळ राजकीय द्वेषातून त्यांनी हा आरोप केला आहे. या आरोपामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा व जनतेचा अपमान झाला आहे.
त्यामुळे गोंडपिपरीे तालुका, गोंडपिपरी शहर, महिला कांग्रेसच्या वतीने राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
बुधवार दिनांक ९ फेब्रुवारीला सकाळी ११-३० वाजता गोंडपिपरि येथील शिवाजी चौकासमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात गोंडपिपरी तालुका शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे,महिला तालुकाध्यक्ष रेखा रामटेके,युवक काँग्रेस अध्यक्ष संतोष बंडावार,कार्याध्यक्ष निलेश संगमवार,शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संदीप करपे,राकेश पुण, बालाजी चनकापुरे, नगरसेवक सचिन चिंतावार, नगरसेवक शारदा गरपल्लीवार, अनिल झाडे,बैस, नरहरशेट्टीवार, काँग्रेसचे नवनिर्वाचित सर्व नगरपंचायत नगरसेवक, पदाधिकारी, महावीकास आघाडी चे कार्यकर्ते, शहर,युवक,महिला काॅंग्रेसचे सर्व पदाधिकारी व सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी यांचेसह जेष्ठ, व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













