वर्धा :- पिपल फॉर द पिपल सोशल फाउंडेशन वर्धा च्या वतीने एक हात मदतीचा अनाथ मुलांसाठी या अंतर्गत प्रथमताच देवळी येथे अनाथ मुलांना शालेय किट वाटप करुण आपल्या सामाजिक दायित्वाची प्रचिती दिली.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक सदस्य समीर राऊत यांनी आपले मत व्यक्त करीत पिपल फॉर द पिपल सोशल फाउंडेशनची भूमिका विषद केली तसेच फाउंडेशनच्या वतीने ज्यांना आई किंवा वडील नाहीत अशा समाजातील अनाथ व गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करुण त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असून अविरत काम करेल आणि अनाथ मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी भावना फाउंडेशनचे संस्थापक सदस्य डॉ. कपिल मून यांनी व्यक्त केली. यावेळी फाउंडेशनचे सर्व संस्थापक सदस्य सतीष गवळी, चंद्रपाल भगत आणि रूपेश शेळके यांनी सुद्धा आपली भावना व्यक्त केली. यावेळी फाउंडेशनच्या वतीने देवळी तालुक्या अंतर्गत येत असलेल्या अडेगाव व देवळी येथील योगिनी पवार, कु. नंदिनी पवार, विशाल भोयर व साहील भोयर या अनाथ मुला मुलींना शालेय किट वाटप करीत त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच शैक्षणिक दृष्टिकोणातून मदत करण्यासाठी पिपल फॉर द पिपल सोशल फाउंडेशन सदैव तत्पर राहील असे आश्वासन देण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिति होती.













