भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम
.
वरोरा (चंद्रपूर )राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचे मागील २६ ऑक्टोंबरपासून राज्यव्यापी संप सुरू आहे. परंतू मविआ सरकारकडून या संपाकडे व कामगारांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.राज्य सरकारच्या अशा मनमर्जी कारभारामुळे एसटीच्या कामगार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले.

अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतर्गत येणार्या आगारातील कामगारांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वितरण करण्यात येत आहे.यानिमित्तानं वरोरा आगारातील कामगारांना जिवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वितरण भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले .

याप्रसंगी, माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, तालुका महामंत्री ओम मांडवकर, शहराध्यक्ष सुरेश महाजन, जेष्ठ नेते बाबासाहेब भागडे, माजी पं. स. सभापती रोहिणीताई देवतळे, भाजयुमोचे प्रदेश सचिव करण देवतळे, अमित चवले, नेमिश लाक्केवार, माजी नगरसेविका सुनीता काकडे, सायरा शेख, गजाजन राऊत, पप्पू साखरीया, विलास गयनेवार, अभिजित गयेनेवार, राजू दोडके, बाबू भोयर, महेश श्रीरंग, अमित आसेकर, दिलीप घोरपडे, एसटीचे किशोर भोयर, राजू समर्थ, वैशाली भोयर, . आदींसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व एसटीचे कामगार बांधव उपस्थित होते.
यावेळेस स्वरतपस्विनी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना मौण श्रद्धांजली ही वाहण्यात आलीी.













