सचिन पत्रकार (विशेष प्रतिनिधी) यवतमाळ झरी जामनी तालुक्यातील मुकूटबन येथील सैनिक मुश्ताक शफीउद्दीन सैय्यद २२ वर्षे सीमा सुरक्षा दलात सेवा दिल्यानंतर निवृत्त होऊन २३ व्या ते गावी परतले. हा अनोखा क्षण ग्रामस्थांनी अविस्मरणीय केला. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत गावातून मिरवणूक काढली. अवघे ग्रामस्थ जवानाच्या स्वागतासाठी एकवटले होते.
मुश्ताक शफीउद्दीन सैय्यद सन २००० ला सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. जम्मू काश्मीर,पंजाब, पश्चिम बंगाल, मेघालय, नागालँड अश्या सीमावर्ती भागात तैनात राहून सेवा दिली या काळात सीमावर्ती भागात उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात पण आले शेवटी २२ वर्ष देशसेवा करून निवृत्त होऊन ते घरी परतत असल्याची वार्ता गावात कळताच एकच उत्साहाचे वातावरण पसरले. कोरोनाच्या सावटातही नियम पाळून त्यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला .
मुश्ताक शफीउद्दीन सैय्यद हे गावात दाखल होताच ‘भारत माता की जय’ च्या नाऱ्यानी परीसर दुमदुमला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच मुकूटबन पोलिस स्टेशन चे पी एस आय सकवान यांनी त्यांचे स्वागत केले . त्यानंतर वाहनातून जल्लोषात, बसस्थानक, मातामंदिर मार्गे घरापर्यंत मिरवणूक काढून घरी पोहचवण्यात आले .
रफिक शेख व मित्रमंडळी , रामनवमी उत्सव समिती ,जय बजरंग गणेश मंडळ, ईस्लाहूल मुस्लमीन कमिटी न्यू इलेव्हन क्रिकेट क्लब ,डॉल्फिन क्रिकेट क्लब आजी-माजी सैनिक यांनी यासाठी पुढाकार घेतला .