दिल्ली : काॅमेडियन राजू श्रीवास्तव ( comedien raju shrivastav ) यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी दिल्लीतील एम्समध्ये निधन ( comedien raju shrivastav passes away ) झाले. त्याच्या कुटुंबीयांनी याला दुजोरा दिला. जिममध्ये वर्कआउट करताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्याच्या हृदयामध्ये अनेक ब्लॉकेज असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर एम्सच्या डॉक्टरांच्या टीमने त्यांची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नव्हती. अखेर ४१ दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत श्रीवास्तव यांनी आज आपला जीव सोडला. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वजण ओल्या डोळ्यांनी त्यांना आदरांजली वाहत आहेत.