मुंबई – शिवसेनेच्या दसरा मेळावाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात ( Dussehra together dispute in Bombay High Court ) पोहचला आहे. शिवसेना ठाकरे गटाला अद्यापही महापालिकेकडून परवानगी न मिळाल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) शिवसेनेने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उत्तर सादर करण्याकरिता महापालिकेला निर्देश देत उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दसरा मेळावा पारंपारिक आहे. मात्र, शिवाजी पार्क येथील दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनीही अर्ज केल्याने महापालिकाने अद्याप कोणालाही परवानगी दिलेली नाही.
याचिकेवर उद्या सविस्तर सुनावणी –
न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष –
शिवसेना दसरा मेळावा हा पारंपरिक मेळावा आहे. या मेळाव्याला परवानगी मिळण्याकरिता शिवसेनेच्या वतीने पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ उमटून देखील अद्यापही परवानगी न दिल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये लवकरात लवकर सुनावणा घेण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने या याचिकेवर उद्या सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर यांना कुणाचा आवाज ऐकायला येणार या संदर्भातील निर्णय उद्या होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचा आक्रमक पवित्रा –
शिवसेनेतून शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील यावर्षी शिवतीर्थावर मेळावा घेण्याचे जाहीर केले. मुंबई महानगरपालिकेने अद्यापही कोणत्याही गटाला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यावर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा निमित्त कोणाचा आवाज ऐकायला येणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत असताना शिवसेनेची बुलंद आवाज, बुलंद तोफ समजले जाणारे संजय राऊत यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच होणार असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शिवतेर्थावरच दसरा मेळावा होणार यासंदर्भातील म्हटले आहे. त्यामुळे काहीही झालं तरी दसरा मेळावा शेवटी आता शिवतीर्थावरच होणार या शिवसेना आता ठाम असल्यास देखील त्यांनी सांगितल आहे. याच प्रकरणात आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या ( BMC Elections ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने तयारी सुरू केली आहे. खास करून भारतीय जनता पक्षाने ( Bharatiya Janata Party ) मुंबई महानगरपालिकेवर आपले सत्ता आणण्यासाठी वेगवेगळ्या रणानित्या आखायला सुरुवातही केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने देखील आपली कंबर कसली असून, आज मुंबईत शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडणार आहे. सायंकाळी सात वाजता गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे हा मेळावा ( Shiv Sena gathering at Nesco complex ) पार पडणार असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात येणारा हा मेळावा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष –
त्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे गटप्रमुखांना संबोधन करणार आहेत. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती, शिवसेनेचे सुरू असलेली राजकीय कोंडी, पक्ष फुटी बाबत उद्धव ठाकरे आज नेमकं काय म्हणणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष असणार आहे. दसऱ्याला दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा ( Shiv Sena Dussehra gathering ) पार पडत असतो. गेली अनेक वर्ष या ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडण्याची परंपरा आहे.
दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच –
मात्र, शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटी नंतर या परंपरेत खंड पडणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण एकनाथ शिंदे गटाकडून देखील दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर घेण्याबाबत हालचाली अद्यापही सुरू आहेत. यातच महानगरपालिकेकडून शिवसेनेला अद्यापही दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, परवानगी मिळो किंवा न मिळो दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर घेण्यावर शिवसैनिक ठाम आहेत. त्यामुळे या सर्व मुद्द्यावरही उद्धव ठाकरे गटप्रमुखांच्या मेळाव्यात काय म्हणणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.