वरोरा :- केंद्रातील मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून लक्ष करीत असल्याचा आरोप करुन वरोरा काँग्रेसने आज सत्याग्रह आंदोलन केले .
भर पावसात गांधीजींच्या पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला. ‘ईडी से हम नहीं डरेंगे…देश की खातिर हम लड़ते रहेंगे’ ‘हुकूमशाही केंद्र सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
खासदार बाळु धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रोषनी मकवाने यांना निवेदन सादर केले. केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, माजी गटनेते गजानन मेश्राम,माजी पं.स. सभापती रवींद्र धोपटे, राजू महाजन, मनोहर स्वामी, प्रदीप बुराण, निलेश भालेराव, छोटु शेख,अनिल झोटींग,शुभम चिमुरकर, सुरज गावंडे, सुनंदा जीवतोडे, दिपाली माटे, रत्ना अहिरकर, मंगला पिंपळकर,शिरोमणी स्वामी, ऐश्वर्या खामनकर,मिना रहाटे,चेतना शेट्टे,सुभाष दांदले,सलीम पटेल, सनी गुप्ता,पंकज नाशिककर,प्रमोद काळे,राहील पटेल,प्रफुल्ल आसुटकर, राहुल देवळे, हरिभाऊ भाजीपाले, निसार पठाण, मनोज पेंदोर, सुजीत कष्टी आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.













