भद्रावती : भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयातील वाणिज्य विभागप्रमुख डॉ.विजय टोंगे व डॉ. सुहास तेलंग लिखित “सांख्यिकी तंत्रप्रणाली व व्यावसायिक अंकगणित” या पुस्तकाचे प्रकाशन यंग टीचर्स असोसिएशन या प्राध्यापक संघटनेचे सर्वेसर्वा डॉ. प्रदीप घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन प्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय बेले, डॉ. मोहन जगनाळे, डॉ. विनायक बोढाले, डॉ. फुलचंद निरंजने, डॉ. संदीप मांडवगडे, डॉ. केवलराम कराडे, डॉ. रोशन फुलकर, डॉ. पी. एस. वैराळे, डॉ. बी.के. धोंगडे, डॉ. तात्याजी गेडाम, डॉ भास्कर लेनगुरे, डॉ. राहुल सावलीकर, डॉ.सी. के. जिवने, डॉ. राजेश डोंगरे, डॉ. हरिचंद्र कामडी, डॉ श्रीराम गहाणे, डॉ. रेखा मेश्राम, डॉ.एम. आर.चौधरी, डॉ.मंडल, डॉ.सोनवणे, डॉ.गजभे, डॉ. विजय बनकर प्रामुख्याने विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
व्हिडीओ बातमी
पुस्तक प्रकाशनप्रसंगी बोलताना डॉ. घोरपडे म्हणाले की, “आज प्रकाशित झालेले हे पुस्तक वाणिज्य विद्याशाखेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त मार्गदर्शन करणारे आहे. या पुस्तकाचे लेखन अभ्यासपूर्ण असून अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा सर्वांगसुंदर समावेश असलेले हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ उत्तम घोसरे, प्रास्ताविक डॉ.सुहास तेलंग, आभारप्रदर्शन डॉ.यशवंत घुमे यांनी केले. यावेळी गोंडवाना विद्यापीठ क्षेत्रातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.