• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार- प्रशांत कदम

Ashish Ghume by Ashish Ghume
July 24, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार- प्रशांत कदम
Spread the Information

वरोरा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परिस्थिती पाहून काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुका मात्र शिवसेना स्वबळावरच लढणार असे शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी वरोरा येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
प्रशांत कदम हे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र लिहून घेण्यासाठी दोन दिवसाच्या दौऱ्यावर २४ जुलै रोजी वरोरा येथे आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य,माजी पंचायत समिती सदस्य,माजी नगरसेवक यांचा मेळावा घेण्यात आला.या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना प्रशांत कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका ठामपणे मांडली. सन २०१९ मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असताना शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केली. हा निर्णय योग्य होता का ? या प्रश्नावरचे उत्तर देताना प्रशांत कदम यांनी सावध पवित्रा घेत तो चुकल्याचे मान्य केले. परंतु आघाडीची सत्ता स्थापन होण्यापूर्वी भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापनेचे स्वप्न बघून पहाटे शपथविधी आटोपला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही. तशी वेळ येईल तेव्हा दुकान बंद करेल असे म्हटले होते. याकडे प्रशांत कदम यांचे लक्ष वेधले असता त्यांनी असे निर्णय त्या-त्या वेळची परिस्थिती पाहून घेतले जातात असे सांगितले. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी तयार आहे असे म्हटले होते. मग एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला असताना उद्धव ठाकरे शिंदे गटासोबत का जात नाही या प्रश्नाच्या उत्तरावर प्रशांत कदम यांनी हे एक षडयंत्र असून पुढे भाजपापासून शिवसेनेला फार मोठा धोका असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी तो निर्णय बदलला असे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस मुळे सेनेचे नुकसान झाले असा आरोप होत आहे. यावर बोलताना प्रशांत कदम यांनी याची स्पष्ट कबुली दिली. आणि नुकसान नव्हे तर राकाने शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केला असे सांगितले. यापुढे महाराष्ट्रात नव्हे तर देशात उद्धव ठाकरे यांची शिवसेना एक मोठा पक्ष म्हणून उभारी घेईल आणि भाजपालाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच युती करण्याची गरज पडेल असा विश्वास प्रशांत कदम यांनी व्यक्त केला.तसेच भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली नाही तर महाराष्ट्रात भाजपाचे १२ पेक्षा अधिक खासदार निवडून येणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला. शिवसेनेतून फुटलेले चाळीसही आमदार हे दबावामुळे गेले आहे. ४० आमदारांवर नसल्या तरी त्यापैकी बराच आमदारांवर ईडीच्या कारवाया आहे. भाजपा सोबत गेले की ईडी सीबीआय सारख्या कारवाया थांबतात. आणि त्यामुळे फुटीर गटाने हा पवित्रा घेतला असे सांगून उद्या संजय राऊत भाजपात गेले तर त्यांच्यावर सुरू असलेल्या कारवाया थांबतील असा टोला कदम यांनी लगावला.मग संजय राऊत यांना भाजपात पाठवून सत्य पडताळून पहायला काय हरकत आहे असा प्रश्न पत्रकारांनी केला.यावर प्रशांत कदम यांनी उत्तर देण्याचे टाळले. आदित्य ठाकरे त्यांच्या दौऱ्यात फुटलेल्या शिवसेना आमदारांना राजीनामा देऊन निवडून येण्याचे आवाहन करीत आहे.२०१९ मध्ये निवडून आलेले आमदार भाजपा-सेना युतीमध्ये निवडून आलेले होते. शिवसेना आमदारांना भाजपाची मते मिळाली होती. युतीमध्ये निवडून आले असताना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत जाताना शिवसेना आमदारांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक का लढली नाही ? असा प्रश्न प्रशांत कदम यांना केला असता त्यावर ते अनुत्तरीत झाले. खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्री समोरील हनुमान चालीसा पठनावर प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा कसा काय दाखल झाला. त्यांनी कोणता राष्ट्रद्रोह केला होता. तसेच यावरून शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडली असे समजायचे का ? या प्रश्नाचे उत्तर देताना खासदार नवनीत राणा यांचा तो स्टंट होता असे सांगून शिवसेनेने हिंदुत्वाचा विचार कधीही सोडलेला नाही व सोडणार नाही असे ठामपणे सांगितले. भविष्यात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोबत जाण्याची गरज पडलीच तरीही वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असल्याने शिवसेना ही जागा कधीही सोडणार नाही असे एका प्रश्नाचे उत्तर देतांना कदम म्हणाले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

Tags: #adityathakare#shivsenaaditya thakare shivsena chandrapurCHANDRAPURPRASHANT KADAMUDDHAW THAKAREशिवसेना स्वबळावरच लढणार
Previous Post

विद्युत विभागाच्या निष्काळजीने शहाबुद्धिन शेख या शेतकऱ्याचा मृत्यू.

Next Post

आयुष्याला आकार देणाऱ्या आईचे निधन वेदनादायी: आ.सुधीर मुनगंटीवार

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
आयुष्याला आकार देणाऱ्या आईचे निधन वेदनादायी: आ.सुधीर मुनगंटीवार

आयुष्याला आकार देणाऱ्या आईचे निधन वेदनादायी: आ.सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1