चंद्रपूर :- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वतीताई पाटील
यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे.
आई, तूच माझ्या आयुष्याची बदललीस ग काया,
साष्टांग नमन करुनी पडतो आई मी तुझ्या पाया
प्रेम तुझे आहे आई, जगात सर्वांहुन भारी स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी !
असं एका कवीने लिहून ठेवलंय, आणि तीच प्रत्येकाच्या आयुष्यातील सत्यता आहे. तुम्हाला आम्हाला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचवण्यासाठी जिवाचं रान करणारी, प्रसंगी चुका पदरात घालणारी, सुख दुःख जिच्याकडे अत्यंत मोकळेपणानं मांडू शकतो असं हक्काचं व्यासपीठ जेव्हा आयुष्यातून निघून जातं ती वेदना किती असह्य असेल हे मी समजू शकतो.करवीनिवासिनी माता महालक्ष्मी या दुःखातून सावरण्याची शक्ती चंद्रकांतदादा यांना प्रदान करो हिच प्रार्थना. माझ्या परिवाराकडून आदरणीय आईना भावपूर्ण श्रद्धांजली!