घुग्गुस :- वर्धा नदीला पूर आल्यानं धानोरा पुलावर पाणी वाहत असून चौथ्यांदा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे.
मागील 22 दिवसांपासून चंद्रपुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.अशातच वर्धा नदीला पूर आला.दरम्यान घुग्गुस जवळील धानोरा पुलावरून पाणी वाहत असल्यानं धानोरा गडचांदूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान पुराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यानं मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे.