वरोरा:- भारताच्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मु हया बहुमताने निवडून आल्या आहेत. पहिल्यांदाच आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती पदावर निवड झालेली असून त्याबद्दल डॉ. अंकुश आगलावे केंद्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष यांनी अभिनंदन केले आहे. हा विजय देशातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय मिळवून देईल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु एक उत्तम राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती म्हणून बहुमान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या निवडीने सर्व जाती पंथातील नागरिकांना न्याय मिळेल.
भारतातील संविधानाने सर्व स्तरावरील नागरिकांना सर्वाेच्च पदावर जाण्याची संधी दिलेली असून कुठेही भेदभाव केलेला नाही. सर्वांना समान संधी संविधानाने दिलेली आहे. भारतीय संविधान जगातील सर्वात महान व उत्कृष्ठ संविधान आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू विजय हा केवळ आदिवासी समाजाचा सन्मान वाढविणारा नसून सर्व घटकातील भारतीय नागरिकांचा विजय असल्याचे डॉ. अंकुश आगलावे यांनी म्हटले आहे.