चंद्रपूर :- गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्याच गावांना पुराणे वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे . भद्रावती तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल(२० जुलै ) केली . पुराच्या पाण्यामुळे अनेक गावातील पाणीपुरवढा पाईप लाईनचे नुकसान झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याच्या अनेक तक्रारी या वेळेस नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या . यावेळेस या गावातील नागरिकांना मोफत पिण्याचे पाणी पुरविण्याचे आदेश मुनगंटीवार यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले होते . त्यानुसार भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती येथील भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखडे यांनी आजपासून या पूरग्रस्त भागात मोफत जल सेवा सुरु केली आहे.
वरोरा भद्रावती तालुक्यातील वर्धा नदी किनाऱ्यावर वसलेल्या अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे . यावेळी पूर एवढा भयावह आहे की, यात शेती ,घर , जीवनावश्यक वस्तू या पुराच्या पाण्यात बुडाल्याने खराब झाल्या आहेत . तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक गावांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन व मोटारपंप पाण्यात बुडाल्याने शुद्ध पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता . याबाबत काल नागरिकांनी आपल्या समस्या आमदार सुधीर मुनगंटीवार , माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांना बोलून दाखविल्या . या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन या गावांना मोफत शुद्ध पाणी पोहचविण्याचा सूचना तसेच आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना या वेळी मुनगंटीवार व अहीर यांनी दिल्या होत्या .
त्यानुसार २१ जुलै पासून भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शन भाजयुमोचे जिल्हाउपाध्यक्ष आकाश वानखडे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील त्या पूरग्रस्त भागात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवढा सुरु करण्यात आला आहे . जोपर्यंत या गावांची नादुरुस्त पाणी पुरवठा पाईपलाईन , मोटार पंप सुरळीत सुरु होत नाही तो पर्यंत ही जलसेवा सतत सुरु राहील असे वानखडे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले . ज्या गावांना शुद्ध पाण्याची कमतरता आहे. त्यांनी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी पाणी पुरवढा करता येईल असे आवाहनही यावेळी त्यांनी केले . विजय वानखडे , विस्मय बहादे , प्रदीप मांडवकर , निलेश नवघरे संदीप कालर , मंगेश महातडे , कुचना ग्रामपंचायत उपसरपंच मनोज तिखट , अनुप खुटेमाटे, पाटाळा ग्रामपंचायत सदस्य संदीप एकरे या उपक्रमासाठी अथक परिश्रम घेत आहेत