भद्रावती : केंद्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी वर्धा नदीवर बांधलेल्या पुलाच्या बंधा-यामुळेच गावांत पुर आल्याचा आरोप केलेला आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देवून पुलाचे खाली बांधलेल्या बंधा-यामुळेच पुर गावात शिरल्याचे निदर्शन आणुन दिले.
वरोरा राष्ट्रीय महामार्ग 930 च्या वर्धा नदीवर पुलाच्या खाली बांधलेल्या बंधा-यामुळे पाटाळा, माजरी, थोराना, मनगांव व राळेगांव या गावात पाण्याची पातळी 12 ते 13 फुट वाढून गावात पाणी शिरले. अनेक नागरिकांचा पुराचा फटका बसला व हजारो हेक्टर शेत जमीन पाण्याखालील आली. त्यामुळे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 1994 च्या पुरापेक्षा 13 फुट उंच पातळी असलेला हा पुर होता, पुराचे पाण्याची पातळी ही वर्धानदीवर बांधकाम करण्यात आलेला पुलाच्या खाली बांधलेल्या बंधा-यामुळेच आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्थानिक व जिल्हा प्रशासनाच्या अधिका-यांनी कोणतीही पुर्व सुचना न देता धरणाचे दरवाजे उघडले त्यामुळे अचानक गावात पाणी शिरले. झोला ते पाटाळा जवळपास 3 कि.मी अंतराचा बांधामुळे नदीचे पाणी पात्राच्या वरून वाहून पाणी गावात शिरले. या पुराला वणी- वरोरा राष्ट्रीय महामार्गावर वर्धा नदीवर बांधलेल्या पुल कारणीभुत आहे या पुलाचे नियोजन करून पुराचे पाणी कसे नदीव्दारे काढता येईल या बद्दल प्रशासनाने दखल घेण्याची मागणी यावेळी आगलावे यांनी केली.
या पुरामुळे नागरिकांचे घरे बुडाली, नागरिकांना जेवनाची व्यवस्था केली गेली नाही. मौल्यवान वस्तुंचे नुकसान झाले, अन्न धान्य खराब झाले, गुरे ढोरे मरण पावली, हजारो हेक्टर जमिन पाण्याखाली यात तुर सोयाबीन कापुस पिकांचे नुकसान झाले. दुबारा पेरणी करण्याचे संकट शेतकरी बांधवांवर आले आहे.