भद्रावती – येथिल योग्या नेत्रालय व सर्जिकल सेंटरच्या विद्यमाने तालुक्यातील पीर्ली येथील श्रीकृष्ण मंदिरात मोफत रोगनिदान शिबिर घेण्यात येऊन विविध आजारावरील रुग्णांना विनामूल्य औषधे वितरित करण्यात आले.या शिबिराचा गावातील १४० महिला व पुरुषांनी लाभ घेतला.
या शिबिरात डॉ.मोनिका प्रशांत नागपुरे व त्यांच्या चमूनी १४० रुग्णांची मोफत तपासणी करून विविध आजारावरील रुगांना विनामूल्य औषधे वितरित करण्यात आली. सदर शिबिर सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध आजारांनी असलेल्या रुग्णांसाठी सेवाभावी भावनेतून घेण्यात आले.शिबिरामध्ये सुभाष मत्ते, काजल मत्ते,अतुल नागोसे,शालिक पचारे,माधुरी दानव व महेश डाखरे यांनी सहकार्य केले.